मोटेगाव येथे वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज पुंण्यतिथी उत्साहात

61

नेरी

.           मोटेगाव येथे गुरुदेव सेवा मंडळ च्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तीन दिवसीय पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मोट्या उत्साहात पुण्यतिथी साजरी करण्यात आली. दि 19 डिसें पासून पुण्यतिथी कार्यक्रमाला सुरवात झाली ग्रामसाफई समुदाइक ध्यान करून घटस्थापणा नारायण बावणे महाराज यांच्या हस्ते करणयात आली.

.            यानंतर दरदिवशी जागृती भजनाचे आयोजन करण्यात येत होते यात अनेक भजन मंडळांनी भाग घेतला होता दि 21 ला ग्रामसफाई करून रामधून वाजत गाजत महाराज्यांच्या पालखी सह गावातून मुख्य मार्गाने काढण्यात आली या पालखी मिरवणुकीला गावातील महिला पुरुषांनी बालगोपालांनी भाग घेतला होता ढोल तश्या आणि टाळ मुदनगाच्या निनादात व राष्ट्रसंताच्या जयघोषात मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली.

.           यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हभप लाटलवार महाराज यांच्या सुरेख वाणीतून कीर्तन पार पडले गोपाळकाळा महाराजांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदर जागृती भजनामध्ये गुरुदेव भजन मंडळ सिरपूर गुरुदेव भजन मंडळ खुटाळा गुरुदेव भजन मंडळ पेंढरी गुरुदेव भजन मंडळ केवाडा पेठ गुरुदेव भजन मंडळ गोरवट गुरुदेव भजन मंडळ खांबाडा गुरुदेव भजन मंडळ हरणी गुरुदेव भजन मंडळ बोथली गुरुदेव वारकरी भजन मंडळ, मंजुडा माता महिला, गुरु माहुली भजन मोटेगाव मंडळ यांनी भाग घेतला होता मौन श्रद्धांजली अर्पण करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली