नागभीड येथे नेतृत्व विकास कार्यक्रम

36

नागभीड

.         नागभीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यातील बुथ प्रमुख व बी. एल. ए. यांचे नेतृत्व विकास अभियान (LDM) शिबीर आयोजित कारण्यांत आले होते.

.         या शिबिराला मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव माजी आमदार डॉ. अविनाश वर्जूकर, आदिवासी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, जेष्ठ काँग्रेस नेते पंजाबराव गावंडे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, विधानसभा सामन्वयक डॉ. सतीश वारजुकर, लोकसभा एल. डी. एम. समन्वयक लता पेदापल्ली, विधानसभा एल. डी. एम. समन्वयक विनोदभाऊ बोरकर यांनी मार्गदर्शन केले.

.         यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, चिमुर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय पाटील गावंडे, कृ. उ. बा. समिती संचालक पुरुषोत्तम बगमारे, माजी जि. प. सदस्य खोजराम मारसकोले, डॉ. मोहन जगनाडे, माजी नगरसेवक नरेंद्र हेमने, हिवराज मरसकोले, गणेश फुंडे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष तबरेज शेख, सेवादल अध्यक्ष रविंद्र कावळे, किसान काँग्रेस अध्यक्ष मधुकर बावनकर, शरद सोनवाणे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष प्राणया गड्डमवार, माजी सभापती रेखा जगनाडे, गडचिरोली काँग्रेस परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले व तालुक्यातील बुथ प्रमुख तसेच बी. एल. ए. उपस्थित होते.