Home विदर्भ खाजगीकरणाच्या विरोधात भीमशक्तीचा 13 डिसेंबरला मोर्चा

खाजगीकरणाच्या विरोधात भीमशक्तीचा 13 डिसेंबरला मोर्चा

1290

कोठारी 

.           शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा या मागणीला घेऊन भीमशक्ती च्या वतीने 13 डिसेंबर ला दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य संविधानिक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धकृती पुतळा बाबुपेठ, चंद्रपूर येथुन होणार आहे.

.           राष्ट्रीय समस्या घेऊन या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी अपेक्षा पिंपळे, भिमशक्ती महिला अध्यक्ष विदर्भ प्रदेश, सरोज पुनवटकर, महिला अध्यक्ष जिल्हा चंद्रपूर, पंकज भरणे, अध्यक्ष जिल्हा चंद्रपूर, कुणाल गायकवाड, कार्याध्यक्ष जिल्हा चंद्रपूर, माया मेश्राम कार्याध्यक्ष जि. चंद्रपूर, पियुष धुपे, महासचिव जि. चंद्रपूर, प्रदिप कवटे, संघटक जिल्हा चंद्रपूर यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली.

.           शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे भारताची भावी शैक्षणिक पिढी उध्वस्त होत आहे. ती गुलाम होण्याच्या पाऊलवाटेवर उभी आहे. तेव्हा विद्यार्थि पालक व शिक्षकांनी या राष्ट्रीय मोर्चात सामिल व्हावे शिक्षणाचे खाजगीकरण हे भारतीय समाजात सामाजिक, आर्थिक विषमता निर्माण करण्याचे षडयंत्र आहे. शिक्षणाचे खाजगीकरण हे समाजात अंधश्रध्दा कायम ठेवण्याचे षडयंत्र आहे. शिक्षणाचे खाजगीकरण म्हणजे भारतीय लोकांची वैज्ञानिक दृष्टी नष्ट करून वैदिक अभ्यासक्रम अमलात आणण्याचे षडयंत्र आहे. समस्त अनु. जाति, अनु. जमाति, भटक्या जाति, विमुक्त जमाति, विशेष मागास प्रवर्ग आणि ओबिसी समाजाचे संविधानिक हक्क व आरक्षण संपविण्याचे षडयंत्र आहे.एकंदरित शिक्षणाचे खाजगिकरण हि सरकारची संविधान विरोधि भुमिका आहे. त्यामुळे शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे म्हणजे शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी असे आहे, सरकारने समान शाळा, समान शिक्षण व समान वातावरणातील शिक्षण सुरू करावे, अ. जातीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रूपये १५०० कोटी सरकारने त्वरित वितरीत करावी, कंत्राटी पध्दत बंद करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे. अश्या महत्त्वाच्या मागण्या घेऊन हा मोर्चा निघेल. सर्व बहुजन समाजाला यात सक्रिय सहभागाचे आवाहन आयोजकांनी  केले आहे.

 

error: Content is protected !!