Home सामाजिक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

1299

भद्रावती

.      तहसील अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था भद्रावतीच्या पंचवार्षिक निवडणुका 2023-28, 31 डिसेंबरला होऊ घातली असून याकरिता  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, प्रहार शिक्षक संघटना, शिक्षक भारती संघटना, समता शिक्षक संघ, महाराष्ट्र प्रांत प्रमुख संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक यांच्यात निवडणूक लढविण्याचे ठरले. शिक्षक महासंघाच्या पाठिंब्याने “क्रियाशील एकता पॅनेल” या नावाने निवडणुक लढविली जाणार आहे . त्याकरिता स्थानिक श्रीसंत झिंगुजी मठासमोर निवडणूक प्रचार कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

.        उद्घाटन प्रसंगी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सहसचिव उर्मिला अजय बोंडे, अखिल महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे पुरुषोत्तम गंधारे, जिल्हा नेते जगदीप दुधे, महाराष्ट्र कास्ट्राईब वेल्फेअर फेडरेशनचे सरचिटणीस मोरेश्वर बारसागडे, जिल्हा परिषद कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब  कर्मचारी महासंघाचे चानकुमार खोब्रागडे, प्रहार शिक्षक संघाचे राजू घोडमारे, शिक्षक भारती संघटनेचे कालिदास येरगुडे, जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संभाजी पारोधे, अखिल महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षक संघाचे सदानंद मुंगेलवार, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे अजय भगत, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी संस्थेचे तालुकाध्यक्ष अजय बोंडे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व सदस्यांच्या उपस्थितीत घेतला.  कार्यक्रमाचे संचालन अजय बोंडे यांनी तर आभार निखिल ठमके यांनी मानले. कार्यक्रमाचे सर्व सदस्यांनी योगदान दिले आहे.

error: Content is protected !!