वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात आ. धानोरकरांच्या हस्ते विकासकामांचे भुमीपूजन 

41

       ठिकठिकाणी भूमिपूजन व लोकार्पन       

चंद्रपूर

.     वरोरा व भद्रावती तालुक्यातील विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पण सोहळा आमदार प्रतिभा बाळु धानोरकर यांच्या हस्ते पार पडला. या दौऱ्यात त्यांनी मागील  १० दिवस झंझावाती दौरा केला व शेकडो कामांचे भूमिपूजन केले. या काळात त्यांनी विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पण केले. यामध्ये स्मशानभूमी, रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सार्वजनिक सुविधा, आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा इत्यादींचा समावेश आहे. या दौऱ्यात त्यांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन विकास कामांची पाहणी केली आणि लोकांशी संवाद साधला. या विकास कामांमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

.     याप्रसंगी वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा बाजार समिती माजी सभापती विशाल बदखल, जिल्हा मध्यवर्ती बँक माजी संचालक सुनंदा जीवतोडे, बोर्डा सरपंच यशोदा खामणकर, शहराध्यक्ष दिपाली माटे, रवींद्र धोपटे, पुरुषोत्तम पावडे, देवानंद मोरे, निखिल हिवरकर, सुभाष दांदडे, साहेबराव ठाकरे, प्रफुल आसुटकर, संजय चिमुरकर, मिथुन ठाकरे, अंबादास टोंगे, गणेश काळे, प्रमोद मगरे, बाळू चिंचोलकर, रुपेश लभाने, सुरेश भायनकर, मंगेश देहारकर, संवर्ग विकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसागडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मत्ते, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता झाडे, विस्तार अधिकारी प्रणव बक्षी यासह गावातील सरपंच उपसरपंच तसेच ग्रामस्थांची उपथिती होती.