नेरी
. चिमूर तालुक्यातील नेरी जवळच असलेल्या सिरपूर, मोटेगाव येथील शेतकरी मागील 50 वर्षपासून रेशीम उत्पादनाचे काम करीत असून अळी पासून कोसा बनवून त्याची विक्री करून उत्पन्न घेणे हा व्यवसाय सुरू आहे. मात्र अनेक वर्षांपासून रेशीम कोसा चांगले उत्पन्न देते तर काही वर्षी सदर उत्पादन हे शेतकऱ्यांना घाटयात घालतो परंतु यावर्षी मोठया जोमाने रेशीम काढणाऱ्या शेतकऱ्यांनी लागवड केली. मात्र वातावरणाच्या बदलाने सदर पीक हातातून जाणार असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून खूपच मोठी हानी झाली. असल्याने अल्प प्रमाणात उत्पन्न होणार तेव्हा संबंधित विभागाच्या प्रशासनाने दखल घेऊन रेशीम कोसा उत्पादन शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यात येऊन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
. सदर असे की रेशीम कोसा उत्पादन हे येन आणि तुरी च्या झाडावर घेतले जाते सदर पिकाचे बीज हे शासन संस्थेकडून विकत घेतले जाते. आणि वनविभागाच्या आकारून दिलेल्या येन झाडा च्या वनात त्या बिजाला सोडून अळी चे पालन पोषण करून मोठी झाल्यावर ती पाने खाऊन रेशीम सोडते आणि रेशीम कोसा तयार होतो या पिकाला 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो असे उत्पादन चिमूर तालुक्यातील सिरपुर मोटेगाव येथील शेतकरी हे येनाचे झाडे मुबलक असल्याने रेशीम शेती करीत असतात आणि उत्पादन घेत असतात मात्र यावर्षी उत्पादनात खूपच घट होण्याची शक्यता असून वातावरणाचा फटका बसला असल्याचे शेतकरी बोलीत आहेत पाऊस न आल्याने उष्णता वाढल्याचा फटका ,ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आदी कारणांनी नुकसान झाले असून प्रशासनाने दखल घेऊन सदर रेशीम कोष्याला भाव द्यावा तसेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.