चंद्रपूर येथे जनता कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे ४ डिसेंबरला स्नेहमिलन कार्यक्रम

32

चंद्रपूर

.         येथील जनता महाविद्यालयातून सन् १९७३मध्ये बी.एस्सी.अंतिम वर्षाला होते.त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात सोडून आता ५० वर्ष पूर्ण झालेली आहे.त्या प्रित्यर्थ या सत्रातील माजी विद्यार्थी जनता महाविद्यालयात ४ डिसेंबर २०२३ रोज रोज सोमवारला दुपारी ३.०० वाजता एकत्र येत असून स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

.         महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.सुभाष यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या स्नेह मिलनाला प्रमुख अतिथी म्हणून या विद्यार्थ्यांना शिकविणारे सेवानिवृत्त प्रा.बोरडे व प्रा.अंधारे हे राहतील. याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व टीएफआर आयचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.सुधाकर आगरकर आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे सेवानिवृत्त इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा.विजय यंगलवार यांचा सत्कार करण्यात येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुभाष पाटील व आभार प्रदर्शन महेश साधनकर तर निवेदन अनंत नासेरी करतील.