चिमूर मार्गावर ट्रक उलटला

51

 

चंद्रपुर

.           वरोरा ते चिमूर महामार्गाचे बांधकाम मागील सात वर्षांपासून सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे बांधकाम अर्धवट सोडले आहे. रस्त्याचे अपुरे बांधकाम असतानाही रिप्लेक्टर किंवा दिशादर्शक फलक लावल्या गेले नसल्याने नेहमीच अपघात घडत आहे. याच मार्गांवरील माता महाकाली पॉलिटेक्निक कॉलेज जवळ पुलाचे बांधकाम करण्यात आले. एका बाजूने रस्ता आणि दुसऱ्या बाजूने खड्डा असल्याने अनेक वाहन धारक या खड्ड्यात पडून अपघात घडत आहे.

.           असाच अपघात शुक्रवारी चिमूर वरून वरोरा कडे येत असताना ट्रक चालकाच्या खड्डा लक्षात आला नसल्याने ट्रक रोड वरून खाली उलटला. यात ट्रक चालक व वाहक जखमी झाले तर याच ठिकाणी मागील महिन्यात एका कृषी सहायकाचा नहक बळी गेला. आणखी किती बळी घेणार हा महामार्ग हे मात्र सांगता येणार नाही.