नेरी शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात दोन गायी ठार

40
शेतकर्‍याची नुकसान भरपाई ची मागणी
नेरी
.        नेरी परिसरात पट्टेदार वाघाचा वावर वाढला असून प्राळीव प्राण्यावर हल्ले होत आहे. दि 24 ला सायंकाळ च्या सुमारास गजानन चांदेकर यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या  पट्टेदार वाघाने गायींवर हल्ला करून दोन गायींना ठार केले.
.        नेरी येथील गजानन चांदेकर यांच्या शेतात दोन गायी चरत असताना  बाजूच्या शेतात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हमला चढविला यात दोन गायी जागेवरच ठार झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली.  सदर घटनेची माहिती वनविभागाला देताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण चौकशी करून अहवाल तयार केला असून नियमित वावरणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करावा आणि गायी मालकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी नागरिकांनी केली आहे.