खडसंगी येथील प्राचीन महादेव मंदिराच्या सभागृहासाठी 30 लाख रुपयाचा निधी मंजूर

38
आ. किर्तिकुमार भांगडिया यांच्या कडून निवेदनाची दखल
चिमूर 
.          तालुक्यातील खडसंगी येथे प्राचीन महादेव मंदिर आहे. या मंदिरात  अनेक वर्षा पासून छोटे – मोठे सामाजिक, धार्मिक कार्यक्रम होत असतात. मात्र सभागृह नसल्याने ग्रामस्थांनी आ. किर्तिकुमार भांगडिया यांच्या कडे सभागृहाच्या मागणीचे निवेदन दिले. निवेदनाची दखल घेत अवघ्या एका महिन्यातच 30 लाख रुपयाचा निधी  उपलब्ध करून दिला. यामुळे ग्रामस्थ व भाविका मध्ये आनंद व्यक्त होत आहे.
.          या बद्दल खडसंगी येथील ग्रामवाशियांकडून आ.कीर्तिकुमार भांगडिया यांचे  बूथ अध्यक्ष प्रमोद श्रीरामे यांनी आभार व्यक्त केले.