सिंदेवाहीतील शिवाजी चौकात अपघाताची शृंखला

47

 कंत्राटदाराचा ढिसाळ कारभार 

सिंदेवाही 

.          सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर- नागपूर या महामार्गावरील मुख्य रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ठेकेदारावर वचक नसल्यामुळे बांधकामाचे काम ढेपाळले असुन मनमानी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

.         कोणत्याही रस्ताची एक बाजू पूर्ण बांधकाम नं करता मधेच शिवाजी चौकमधील रस्त्याचा खोदकाम केल्यामुळे लोकांमध्ये कंत्राटदार विषयी रोष पसरत आहे. तसेच दिनांक १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान कंत्राटदाराच्या निष्काळजी पणामुळे सिंदेवाही येथील बबलू इब्राहिम शेख अंदाजे वय 50 गाडीवरुन तोल गेल्यामुळे दुभाजकावरती गाडी आदळल्याने त्यांच्या कमरेला तसेच इतरत्र मार लागल्याने गंभीरपणे जखमी झाले. त्यांच्या कमरेत जोराचा मार बसल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले व त्यांच्या वर असे शस्त्रक्रिया करण्यात आली.

.         बबलू शेख यांचे बंधू राजू शेख यांनी दुसऱ्या दिवशी रोडचा काम काही तासा साठी बंद ठेवून ठेकेदाराची कानउघाडणी केली. तसेच सिंदेवाही तालुका पत्रकार संघटनेचे पधाधिकारी व सदस्य यांनी स्वतः हजर राहून ठेकेदाराला लवकरात लवकर रोडचे काम करावे जेणे करून कोणालाही हानी पोहचणार नाही याबाबत चर्चा केली. एक वर्षाच्या जवळपास या रोडचे काम सुरु असल्याने लोकांमध्ये तसेच व्यपारी लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने कमालीची नाराजी बांधकाम विभागावरती दिसत आहे.