Home सामाजिक सूर्या मॅरेथॉन जबलपूर स्पर्धेत चिमूर क्रांतीनगरीचा विक्रम ठरला विजेता

सूर्या मॅरेथॉन जबलपूर स्पर्धेत चिमूर क्रांतीनगरीचा विक्रम ठरला विजेता

1198

चिमूर 

.        मध्य प्रदेश येथे आयोजित सूर्या मॅरेथॉन स्पर्धा मध्ये चिमूर तालुक्‍यातील धवनपट्टू विक्रम सिंह बंगेरिया याने पुरुष गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे चिमूर परिसरात आनंदाचे वातावरण आहे. हा तरुण भारतीय लष्करात कार्यरत आहे.

.        पुन्हा एकदा विक्रम च्या कामगिरीने गावाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्वल झाले. क्रांतीनगरी चिमूर येथील रहिवासी विक्रम सिंह बंगेरिया यांनी आजवर देशभरातील विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली छाप सोडली आहे. त्यात भर टाकून त्यांनी क्रांतीनगरीच्या शिरपेचात मानाचा नवा अजेंडा रोवला आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलेही या स्पर्धेत टिकून आहेत, हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राचा चिमूर क्रांती नगरी चा विक्रम बंगरिया विजेता ठरला, विक्रमच्या यशाने चिमूरचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे. विक्रम च्या यशाने परिसरात आनंदाचे वातावरण असून विक्रमचे सर्वत्र कौतुक होत आहे. विक्रमवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!