आनंद निकेतन महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी गठीत

42

वरोरा

.          महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याकरता, व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महारोगी सेवा समिती वरोरा व्दारा संचालित आनंद निकेतन विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची (संलग्नीत विदर्भ अशासकीय महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, जिल्हा चंद्रपूर – गडचिरोली. विदर्भ अशासकीय महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, र.नं एन. जी पी. ४७१७. व महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्त कर्मचारी महासंघ र.नं.एन. एस. के. / के. १५०८) कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

.          कार्यकारिणीमध्ये संघटनेचे अध्यक्ष म्हणून देवानंद अलोने, सचिव सचिन नक्षिणे. कोषाध्यक्ष कमलाकर डुकरे, उपाध्यक्ष . हिना डी. पांडे, सहसचिव प्रफुल बी. थुटे, संघटक भुपेश व्ही साखरे, महिला प्रतिनिधी . अर्चना चव्हाण,यांची निवड करण्यात आली कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनील चिमुरकर महासंघ प्रतिनिधी म. रा, चेतन नागदेवते, संतोष गुंतीवार, मिलींद मेश्राम, सुमीम शिर्के, तुषार पारखी, मैनाबाई मगरे यांची निवड करण्यात आली.याबाबतचे निवेदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे यांना देण्यात आले.प्राचार्य मृणाल काळे यांनी संघटनेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.