2022 मध्ये शेकडो घरांचे पुरामुळे झाले होते नुकसान
माजरी
. दिवाळीपूर्वी पुरामुळे बाधित झालेल्या माजरी येथील शेकडो कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून 5 हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा धनादेश वाटप करण्यात येत आहे.
. जुलै 2022 मध्ये मोठा पूर आला होता ज्यात माजरी संकुलातील हजारो लोकांची घरे, दुकाने, शेतजमीन आणि इतर जीवन संपत्ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. महाराष्ट्र राज्य सरकारने पीडित कुटुंबाला दहा हजार रुपयांची भरपाई जाहीर केली होती. 5000 रुपयांची मदत मनुन यापूर्वीच धनादेशाच्या स्वरूपात देण्यात आली असून उर्वरित 5000 रुपयांची भरपाई दिवाळी सना पूर्वी तहसीदार यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना 5000 रुपयांच्या धनादेशाच्या स्वरूपात देण्यात आली. माजरी येथील पटवारी विलास महादेव शंभरकर व माजरी येथील सरपंच सौ छाया जंगम यांच्या सहाय्याने ही नुकसान भरपाईचे धनादेश देन्यात येत आहे.
धनादेश वाटप कार्यक्रम माजरी येथील प्रत्येक प्रभागात पटवारी विलास शंभरकर हे सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या वतीने धनादेश वाटप करत आहेत. जुलै 2022 मध्ये मोठा पूर आला होता ज्यामध्ये माजरी संकुलातील हजारो लोकांची घरे, दुकाने, शेततळे, गुरे आणि इतर जीवन संपत्ती पूर्णपणे नष्ट झाली होती. शासनाने पीडित कुटुंबाला दिवाळीच्या दिवशी 5,000 रुपयांची संपूर्ण थकबाकी भरायची होती, ज्याचे धनादेश आम्ही घरोघरी जाऊन सर्व बाधित लाभार्थ्यांना देत आहोत. विलास शंभरकर, पटवारी माजरी
पुरात माजरी येथील लोकांनी निसर्गाच्या कहरात आपली जीवनाची पुंजी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती.पीडित कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देणे बाकी होते, ती दिवाळीनिमित्त देण्यात येत आहे.किमान पीडित कुटुंबाला आपल्या मुलांसोबत दिवाळी साजरी होईल. छाया जंगम, सरपंच माजरी