Home सामाजिक नेरी येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज सभागृहाचे भूमिपूजन

नेरी येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज सभागृहाचे भूमिपूजन

1243

नेरी

.           चिमूर तालुक्यातील नेरी येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या भव्य सभागृहाचे भूमिपूजन सोहळा दि 5 नोव्हे ला दुपारी चार वाजता संताजी जगनाडे महाराज नियोजित जागेवर पीएचसी चौक नेरी येथे संपन्न होत आहे
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उदघाटक खासदार रामदास तडस वर्धा, सत्कारमूर्ती म्हणून आमदार बंटी भांगडीया, सहउदघाटक रेखा पिसे प्रथम नागरिक नेरी मान्यवर म्हणून भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

.           आमदार बंटी भांगडीया यांच्या विशेष प्रयत्नाने संत शिरोमणी जगनाडे महाराज सभागृहाकरिता एक कोटींचा निधी उपलब्ध झाला असून भूमिपूजन होऊन लवकरच कामाला सुरुवात होणार आहे दि 5 नोव्हे 11 वाजता मूर्तिपूजन होणार असून 3 वाजता भजन आणि 4 वाजता भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विभागीय अध्यक्ष तेली समाज डॉ. प्रा. रमेश पिसे, अभियंता तेली समाज संघटक नागपूर रमेश पिसे, महादेव पिसे, धनराज मुंगले, घनश्याम डुकरे, श्रीहरी सातपुते, ठाणेदार चिमूर मनोज गभने, चंद्रभान कामडी, अजय पिसे, अल्का लोणकर, शोभा पिसे, लता पिसे, मंगेश चांदेकर, ईश्वर डुकरे, संदीप पिसे, निखिल पिसे, पिंटू खाटीक आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनी उपस्थित राहावे. असे आवाहन जय संताजी युवा मंच नेरी, संताजी जगनाडे महाराज तेली समाज संघटना नेरी समस्त तेली समाज बांधव व भगिनी नेरी यांनी केली आहे.

error: Content is protected !!