Home सामाजिक मराठी प्राध्यापक परिषदेची नवी कार्यकारणी अविरोध जाहीर

मराठी प्राध्यापक परिषदेची नवी कार्यकारणी अविरोध जाहीर

13

डॉ. राजेंद्र वाटाणे यांची अध्यक्षपदी निवड

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर व गोंडवाना विद्यापीठ क्षेत्रातील नवीन कार्यकारिणी (२०२६-२०२९) घोषित

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘मराठी प्राध्यापक परिषदेची’ २०२६ ते २०२९ या कार्यकाळासाठीची नवनियुक्त कार्यकारिणी नुकतीच अविरोध जाहीर करण्यात आली आहे. कोराडी येथील तायवाडे कॉलेजचे डॉ. राजेंद्र वाटाणे यांची अध्यक्षपदी, सी.पी. अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय कुलकर्णी यांची सचिवपदी, तर गडचांदूर येथील डॉ. हेमचंद दुधगवळी यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

विस्तृत कार्यकारिणी आणि पदाधिकारी
परिषदेच्या उपाध्यक्षपदी डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. धनराज खानोरकर, डॉ. नरेंद्र आरेकर, डॉ. संजय निंबेकर, डॉ. मनीषा नागपुरे, डॉ. संगीता खुरद, डॉ. राजेश देशपांडे, डॉ. राकेश कभे आणि डॉ. हेमंत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदाची धुरा डॉ. सोपानदेव पिसे तर सहकोषाध्यक्षपद डॉ. संजय लाटेलवार सांभाळणार आहेत. सहसचिव म्हणून डॉ. परमानंद बावनकुळे, डॉ. शरद मेश्राम, डॉ. राज मुसने, डॉ. अशोक भक्ते, डॉ. अरविंद कटरे, डॉ. भूषण बंड, डॉ. विजय राऊत, डॉ. नरेंद्र घरत आणि डॉ. विनोद भालेराव यांची निवड झाली आहे. प्रकाशन प्रकल्पाची जबाबदारी डॉ. प्रशांत सूर्यवंशी, विजय रैवतकर आणि डॉ. देवयानी चव्हाण यांच्याकडे असून, प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉ. यशवंत घुमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. भूषण रामटेके, डॉ. नरेंद्र मुरमाडे, डॉ. प्रेमा चोपडे, डॉ. अमृता डोर्लीकर, डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. देवमन कामडी, डॉ. मंजुषा गभणे, डॉ. राजेश दिपटे, डॉ. अनिल बोपचे, डॉ. सुधीर मोरे, डॉ. प्रवीण काळे, डॉ. बंडू चौधरी, डॉ. निलीमा कापसे आणि डॉ. पराग सपाटे यांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय प्रमुख
विविध जिल्ह्यांच्या समन्वयासाठी जिल्हाप्रमुखांची घोषणा करण्यात आली असून, नागपूर शहरासाठी डॉ. संजय सिंगनजुडे, डॉ. प्रीती उमाठे आणि डॉ. राखी जाधव तर नागपूर ग्रामीणसाठी डॉ. प्रमोद लेंडे आणि डॉ. प्रवीण घारपुरे यांची नियुक्ती झाली आहे. भंडारा जिल्ह्यातून डॉ. कविता राजाभोज, डॉ. रामलाल चौधरी आणि डॉ. जयश्री सातोकर, गोंदिया जिल्ह्यातून डॉ. जगदीश भैसारे आणि डॉ. इंद्रकला बोपचे, तर गडचिरोली जिल्हा प्रमुख म्हणून डॉ. गणेश चुधरी, डॉ. प्रदीप चापले आणि डॉ. विलास खुणे काम पाहतील. चंद्रपूर जिल्ह्यासाठी डॉ. माधव कांडणगिरे, डॉ. जयश्री शास्त्री आणि डॉ. सुनंदा चरडे तर वर्धा जिल्ह्यासाठी डॉ. सुधाकर भुयार आणि डॉ. प्रमोद नारायणे यांची निवड करण्यात आली आहे.

मार्गदर्शक आणि इतिहास
या नव्या कार्यकारिणीला डॉ. राजन जयस्वाल, डॉ. सत्यवान मेश्राम, डॉ. शरयू तायवाडे, डॉ. श्याम मोहरकर आणि प्रा. श्रीकांत नाकाडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. १९६८ पासून कार्यरत असलेल्या या परिषदेने आतापर्यंत ३६ यशस्वी अधिवेशने घेतली असून ‘अध्यापनाची विचारसूत्रे’‘संवादिनी’ यांसारखी महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित केली आहेत. मराठी प्राध्यापकांच्या शैक्षणिक आणि वैचारिक विकासासाठी ही परिषद कटिबद्ध असून नव्या कार्यकारिणीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!