विविध शासकीय योजनांचे लाभार्थ्यांना वाटप
भद्रावती : शासकीय योजनांची माहिती आणि लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिनांक ०९ मे २०२६ रोजी भद्रावती तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचे’ भव्य आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून विविध विभागांच्या योजनांचे प्रमाणपत्र आणि दस्तऐवज लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
. या शिबिरात महसूल, कृषी आणि समाजकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या कामांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने २१ लाभार्थ्यांना सातबारा, १२ लाभार्थ्यांना ८-अ उतारा, २ लाभार्थ्यांना इंदिरा गांधी योजना, ६ जणांना उत्पन्न दाखला, ५ जणांना नवीन शिधापत्रिका, कृषी विभागाच्या २ योजना, ५ लखपती दिदी योजना आणि १ रेशन कार्ड अशा विविध योजनांच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
. याप्रसंगी व्यासपीठावर भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, बांधकाम सभापती मंगेश सोनुलकर, बालकल्याण सभापती शोभा पारखी, आरोग्य सभापती सुरेखा खुटेमाटे, नगरसेवक सुनील नामोजवार, योगेश गाडगे, गौरव नागपूरे, उषा जाधव, शेतकरी संरक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल बदखल, विजय वानखेडे आणि अमित गुंडावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
. प्रशासकीय स्तरावरून भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर, अप्पर तहसीलदार बालाजी कदम, पोलीस निरीक्षक केदारे, बालविकास प्रकल्प अधिकारी पुनम गेडाम, नायब तहसीलदार सुधीर खांडरे व मनोज आकनुरवार, सहायक निबंधक बोदवळ, पांडे, ढोरे, विस्तार अधिकारी झाडे, पुनवटकर, वनविभागाचे शिंदे, दुय्यम निबंधक झाडे, मंडळ अधिकारी समीर वाटेकर तसेच ग्राम महसूल अधिकारी गुरूदेव तळवेकर, रवींद्र तल्हार, प्रिती बोरसरे, सुषमा वाघमारे, कोमल जोशी, शितल लिहितकर उपस्थित होते.
. कार्यक्रमाला पोलीस पाटील संघटना चंद्रपूरचे अध्यक्ष योगेश मत्ते, उमेद अभियान अधिकारी चोधरी, मोरेश्वर वैद्य, महिला बचत गटाच्या सदस्या, परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकाच छताखाली अनेक शासकीय कामे मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


