आजपासून चंदनखेडा उपबाजार येथे शेतमाल खरेदीचा शुभारंभ

37

भद्रावती

.            तालुक्यातील चंदनखेडा येथे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात दि. ३ नोहेंबर रोज शुक्रवारला 10 वाजता शेतमाल खरेदीचा शुभारंभ होणार आहे. या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते शेतमाल खरेदीचा शुभारंभ करण्यात येईल.

.            याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती अश्लेषा भोयर (जिवतोडे) तसेच समस्त संचालक बंधू -भगिनी उपस्थित राहतील. तरी शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल चंदनखेडा उपबाजार येथे विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर यांनी केले आहे.