Home सामाजिक भद्रावती खरेदी-विक्री संस्थेवर ‘भगवा’ कायम

भद्रावती खरेदी-विक्री संस्थेवर ‘भगवा’ कायम

56

दादाजी भट अध्यक्ष तर ॲड. निलेश पिंगे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

सहकार क्षेत्रात भाजपचा वरचष्मा

१३ संचालकांची बिनविरोध निवड करून दिला एकजुटीचा संदेश

भद्रावती : सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रावती येथील सहकारी शेतकी खरेदी-विक्री सहकारी संस्थेवर पुन्हा एकदा ‘भगवा’ फडकला आहे. सन २०२५-२६ ते २०२९-३० या आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत सर्व १३ संचालकांची बिनविरोध निवड झाल्याने संस्थेतील सत्ता अबाधित राहिली आहे.

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड
निवडणुकीनंतर पार पडलेल्या विशेष सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी दादाजी लटारी भट यांची, तर उपाध्यक्षपदी ॲड. निलेश वामनराव पिंगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपस्थित सर्व संचालकांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

नेतृत्वाचा प्रभाव आणि मार्गदर्शन
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी बँकेची धुरा सांभाळल्यापासून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा प्रभाव निर्माण झाला आहे. शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल होत असून, या संस्थेतील बिनविरोध सत्ता मिळवण्यात त्यांच्या रणनीतीचा मोठा वाटा राहिला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार सुधीर मुनगंटीवार, बंटी भांगडीया, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे व करण देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

नवनिर्वाचित संचालक मंडळ
संस्थेच्या नव्या कार्यकारिणीत लक्ष्मण खाडे, संतोष काळे, पुरुषोत्तम कोंगरे, विलास घोटकर, जनार्धन नन्नावरे, युवराज निबुधे, आण्याजी लांबट, श्रीकांत डोंगे, पंढरी खंगार, गोपीका सुर आणि रत्नमाला आस्कर यांचा समावेश आहे. या सर्वांनी एकजुटीने संस्थेच्या विकासाचा संकल्प सोडला आहे.

यशस्वी नियोजनासाठी विशेष परिश्रम
या प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी श्री साई नागरी सहकारी संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष प्रवीण सुर, भद्रावती बाजार समितीचे सभापती राजू डोंगे, वरोरा बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे, द्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा उपसभापती जयंत टेमुर्डे, उपसभापती अश्लेषा भोयर (जिवतोडे) आणि संचालक गजानन उताणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

.      या बिनविरोध निवडीमुळे सहकार वर्तुळात उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्या जोमाने कार्य करेल, असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!