Home सामाजिक भद्रावतीत २९ मार्चला नववे विदर्भस्तरीय ‘स्मृतिगंध’ काव्यसंमेलन

भद्रावतीत २९ मार्चला नववे विदर्भस्तरीय ‘स्मृतिगंध’ काव्यसंमेलन

137

प्रमोदकुमार अणे भूषवणार अध्यक्षपद

स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन

गझल मैफिल आणि निमंत्रित कवींच्या काव्यवर्षावाने सजणार सोहळा

भद्रावती : नवोदित व प्रथितयश काव्यप्रतिभेचा सन्मान करण्यासाठी आणि साहित्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान, भद्रावतीच्या वतीने रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी ‘नववे विदर्भस्तरीय स्मृतिगंध काव्यसंमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक श्री मुरलीधर पाटील गुंडावार सभागृह येथे संपन्न होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी व प्रख्यात चित्रकार प्रमोदकुमार अणेराव (भंडारा) भूषविणार आहेत.

.     या नियोजित संमेलनाचे उद्घाटन सकाळी ठीक १०:३० वाजता भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांच्या हस्ते ‘स्व. आचार्य ना. गो. थुटे स्मृतीमंचावर’ संपन्न होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अजय देशपांडे ज्येष्ठ समीक्षक वणी, डॉ. किशोर कवठे प्रख्यात कवी राजुरा, प्रा. पुनीत मातकर प्रसिध्द कवी यवतमाळ, डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी भद्रावती, डॉ. प्रकाश वटी मराठी साहित्याचे अभ्यासक ब्रम्हपुरी, विशाल गावंडे प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते भद्रावती, प्रा. विजय गायकवाड भद्रावती, ईत्यादी मान्यवरांची उपस्थिती राहील.

.       ज्येष्ठ साहित्यिक स्व. आचार्य ना. गो. थुटे यांच्या पावण स्मृतिला हे काव्यसंमेलन समर्पित असून, विदर्भातील दिग्गज साहित्यिक तथा कवींची मांदीयाळी भद्रावती नगरीत रंगणार आहे. नवोदित कवींच्या कोवळ्या उर्मी आणि प्रस्थापीत कवींच्या प्रगल्भ लेखनीचा संगम या संमेलनाच्या निमित्ताने साहित्यरसिकांना अनुभवता येणार आहे. नवीण लेखनीला मिळणारी हक्काची दाद, प्रस्थापित कवींचा काव्यानुभव, कवितेच्या प्रवासावरील मार्गदर्शन, या कारणास्तव कवी आणि काव्य रसिकांसाठी सदर काव्यसंमेलन हे आनंदपर्वणीच असते.

.       या एकदिवसीय काव्यसंमेलनात दोन कविसंमेलने व एका गझल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खुले कविसंमेलन देखील आहे. भरगच्च चार सत्रांमध्ये होत असलेल्या या साहित्यसोहळ्यात वाङ्मयीन चिंतनासोबतच काव्यामृताचे रसग्रहन होणार आहे. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात संमेलनाध्यक्ष प्रमोदकुमार अणेराव यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीत कवींचे बहारदार कविसंमेलन संपन्न होत आहे.  या प्रसंगी नामवंत कवी डॉ. किशोर कवठे राजुरा, प्रा. पुनीत मातकर यवतमाळ, इरफान शेख चंद्रपूर, अविनाश पोईनकर बीबी, गजानन माद्यसवार चंद्रपूर, राजेश माहुरकर नागपूर, या दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  विदर्भातील प्रतिभाशाली कवी संमेलनात सहभागी होत असून, मराठी काव्यरसिकांना हे संमेलन एक पर्वणीच असणार आहे.

.       तिसऱ्या सत्रात प्रख्यात गझलकार प्रवीण तुराणकर राजुरा, यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीत कवींची गझल मैफिल सजणार आहे. या मैफिलीमध्ये प्रतिथयश गझलकार जयवंत वानखेडे कोरपना, राम रोगे नांदाफाटा, मंगेश जनबंधू ब्रम्हपुरी, दिलीप पाटील राजुरा, मारोती आरेवार गडचिरोली, यांची उपस्थिती राहणार आहे.  या निमित्ताने बहारदार गझलांचा आस्वाद गझल रसिकांना घेता येईल. संमेलनाच्या चौथ्या सत्रात ज्येष्ठ कवयित्री भारती लखमापुरे वरोरा, यांच्या अध्यक्षतेखाली “कवितेच्या गावात” हे समारोपीय कविसंमेलन संपन्न होईल. या समारोपिय कविसंमेलनात प्रतिथयश कवींची कविता व नवोदीत काव्यप्रतिभेची जुगलबंदी काव्यरसिकांना अनुभवता येणार आहे. या प्रसंगी ज्येष्ठ कवी दीपक शिव आनंदवन, सुभाष उसेवार वरोरा, मंजुषा दरवरे चंद्रपूर, संगिता पिज्दुरकर चंद्रपूर, जयंत लेंझे सिंदेवाही, डॉ. ज्ञानेश हटवार भद्रावती, गणेश पेंदोर वरोरा, हे मान्यवर कवी मंचावर उपस्थित असतील. असे स्मृतिगंध भद्रावतीचे संयोजक प्रवीण आडेकर यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!