Home सामाजिक महसूल विभाग लोकहितासाठी कार्य करणारा – अर्जून पावरा

महसूल विभाग लोकहितासाठी कार्य करणारा – अर्जून पावरा

212

विसापूर येथे पार पडले महाराजस्व समाधान शिबीर

१५0 जणांना विविध दाखले व प्रमाणपत्र वितरण

बल्लारपूर : महसूल विभाग शासनाचा कणा आहे. सर्वसामान्यांना या विभागाशी दैनदिन संबंध येतो. आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर घेतले जात आहे. या लोकाभिमुख उपक्रमाला लोकसहभाग देखील महत्वाचा आहे.कारण महसूल विभाग लोकहितासाठी कार्य करणारा आहे, असे प्रतिपादन बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा यांनी विसापूर येथे शनिवार (१४) मार्च रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात उदघाटक म्हणून केले.

.      बल्लारपूर उपविभागीय व तहसील कार्यालयच्या वतीने विसापूर येथील पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर शनिवार (दि. १४) मार्च रोजी पार पडले. या शिबीरात १५0 जणांना विविध दाखले, सातबारा व प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर शिबीराचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.

.      यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार रेणुका कोकाटे, भूमी अभिलेख उप अधिक्षक अनिल देशमुख, नायब तहसिलदार महेंद्र फुलझेले, रश्मी वावरे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, नायब तहसिलदार अजय मल्लेरवार, पंचायत विस्तार अधिकारी दिलीप बैलनवार, विसापूर येथील सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, नांदगाव (पोडे) उपसरपंच मल्लेश कोडारी यांची उपस्थिती होती.

.      दरम्यान मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण व दीपप्रज्वलन करून शिबीराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना लोकाभिमुख योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक भाषणातून तहसिलदार रेणुका कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा एक बाबत जनतेला उपयुक्त माहिती दिली. त्यांनी शासन आपल्या दारी आल्याची भूमिका विषद केली. संचालन दिपक वडुळे यांनी केले. आभार महसूल सहायक राजेश निखारे यांनी मानले. यावेळी बल्लारपूर तलाठी साज्यातील शेतकरी, नागरिक व महसूल व विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

विविध प्रकरणात दाखले, प्रमाणपत्र व आदेश वाटप
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे दाखले २९ जणांना देण्यात आले. त्याचप्रमाणे ११ शेतकऱ्यांना सातबारा दुरुस्ती, १७ लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेचा मंजूर आदेश, ६४ शेतकऱ्यांचे फेरफार निकाली, ५६ शेतकऱ्यांना संगणीकृत सातबारा उतारा वाटप, ८ अ उतारा वाटप,कृषी विभाग अंतर्गत चारवट येथील शेतकरी प्रदीप ढोबे या शेतकऱ्याला ट्रक्टर वाटप,पंतप्रधान घरकुल योजनेत १२ जणांना घरकुल मंजूर आदेश, घरकुल लाभार्थ्यांना रेती वाहतूक परवाना असे एकूण जवळपास १५0 वर जणांना विविध दाखले, प्रमाणपत्र व आदेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे शिबीर स्थळी भूमी अभिलेख, शासकीय आधार कार्ड केंद्र, महसूल, आरोग्य, शिक्षण, उमेद महिला बचत गट, पंचायत समिती अंतर्गत मनरेगा योजना अंतर्गत ई-केवायसी केंद्र, कृषी विभाग आदी विभागाने आपापले स्टाल लावून योजनांची माहिती नागरिकांना दिली.

error: Content is protected !!