Home सामाजिक “आईचा सन्मान, माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठा !”

“आईचा सन्मान, माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठा !”

451

रवींद्र शिंदे यांची भावूक ग्वाही

भद्रावती येथे भाजपा महिला आघाडीतर्फे ‘कर्तबगार महिलांचा सत्कार’

चंद्रपूर : “आई हा केवळ दोन अक्षरी शब्द नसून, तो माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ आणि यशाचे खरे सूत्रधार आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या आईचा झालेला सन्मान हा माझ्यासाठी कोणत्याही मोठ्या पदापेक्षा किंवा पुरस्कारापेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान आहे,” असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी केले.

.       जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, भद्रावती शहर यांच्या वतीने ‘कर्तबगार महिलांचा सत्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात रवींद्र शिंदे यांच्या मातोश्रींचा विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना शिंदे कमालीचे भावूक झाले होते.

.       ते पुढे म्हणाले की, “आज मी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून जी काही जनसेवा करू शकत आहे, ती केवळ आईने दिलेल्या शिकवणीमुळे आणि संस्कारांमुळेच शक्य झाली आहे. तिने पेरलेली मूल्ये आणि संघर्षाच्या काळात दाखवलेली वाट यामुळेच मी आज समाजकार्यात खंबीरपणे उभा आहे. आईच्या या सन्मानाने सामान्य जनतेप्रती काम करण्याची माझी जिद्द अधिक वाढली असून, हा सन्मान म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी पावती आहे.”

.       या शानदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. उज्वला वानखेडे होत्या, तर उद्घाटक म्हणून वेदान्ती करण देवतळे उपस्थित होत्या. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा वंदना शिंदे, किशोर बावणे, अनिल धानोरकर, अल्का आत्राम, लक्ष्मी सागर, वंदना सिन्हा यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!