अन्यथा शेतकरी अपघात विमा पासून राहणार वंचित
किशोर डुकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर
. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यासाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आणली. या योजना चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा पीएम रिपोर्ट ४५ दिवसात जमा करायचा असतो मात्र पीएम रिपोर्ट मिळाला २ ते ३ महिन्याचा कालावधी लागत असल्याने शासनाच्या कल्याणकारी योजना पासून वंचित राहावे लागत आहे.
. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीएम रिपोर्ट ७ दिवसाच्या आत देण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी या मागणीचे निवेदन तहसीलदार वरोरा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले.
. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आणली यात वाहन अपघात, विज करंट अपघात, सर्पदंश, नैसर्गिक अपघाताचा समावेश आहे. शेतकऱ्याच्या मृत्यू झाल्या नंतर ४५ दिवसाच्या आत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रकरण सादर करावे लागतात मात्र शेतकऱ्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट येण्यासाठी दोन तीन महिन्याचा कालावधी लागत आहे. वेळेवर पीएम रिपोर्ट मिळत नसल्यामुळे शासनाच्या या कल्याणकारी योजनांच्या लाभापासून पीडित कुटुंब वंचित राहतात त्यामुळे अपघात झालेल्या शेतकऱ्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट सात (7) दिवसाच्या आत देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी एका निवेदनातून केली आहे.

