Home सामाजिक खा. प्रतिभा धानोरकर यांचा वरोरा तालुक्यात विकासाचा झंझावात

खा. प्रतिभा धानोरकर यांचा वरोरा तालुक्यात विकासाचा झंझावात

315

४ कोटींच्या २० कामांचे भूमीपूजन संपन्न

ग्रामीण भागाचा कायापालट होणार

रस्ते, शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर खासदार धानोरकर यांचा विशेष भर

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी तालुक्यात झंझावाती दौरा केला. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या खासदार महोदयांच्या हस्ते एकाच दिवशी तब्बल २० मोठ्या विकासकामांचे भूमीपूजन उत्साहात संपन्न झाले. सुमारे ४ कोटींहून अधिक निधीच्या या कामांमुळे तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, या दौऱ्याने ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षण आणि बालविकासाला प्राधान्य
या दौऱ्यांतर्गत ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एकाजुर्ना, चिनोरा, कोंढाळा, आष्टी, वडगाव, दिंदोडा, बोरी आणि पांढुर्णी या गावांमध्ये नवीन अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच केम आणि उमरी नाईक येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार असून, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर होऊन त्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील.

रस्ते विकासासाठी भरीव निधी
दळणवळणाच्या दृष्टीने खासदार धानोरकर यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. यात जामणी-फत्तापूर रोड खडीकरण ५० लक्ष रुपये, सोनेगाव-गुंजाळा रस्ता मजबुतीकरण ४० लक्ष रुपये, मोखाळा ते आल्फर केम जोड रस्ता ७५ लक्ष रुपये, चिनोरा (पारधी टोला) सिमेंट रस्ते, नाली व पुलाची कामे. या कामांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच वडकेश्वर तीर्थक्षेत्र येथे ३० लक्ष रुपये खर्चाच्या संरक्षण भिंतीचे कामही सुरू करण्यात आले.

अनेक योजनांचा संगम
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना, पारधी विकास कार्यक्रम आणि तीर्थक्षेत्र विकास निधीतून हा कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणल्याने या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

मान्यवरांची उपस्थिती
या दौऱ्याप्रसंगी वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, माजी सभापती राजू चिकटे, उपविभागीय अभियंता मोहन खराटे, शाखा अभियंता डंभारे, सुमठाना सरपंच शुभांगी दातारकर, एकार्जुना सरपंच उज्वला थेरे, आष्टी सरपंच जयमाला भोयर, प्रमोद मगरे, लक्ष्मण चिंचोलकर, मनोज चिंचोलकर, रवी भोयर, दिवाकर निखाडे, संजय आसेकर, साहेबराव ठाकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, गावकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

error: Content is protected !!