Home सामाजिक हिवरपुरी हनुमान मंदिरात ‘तुकाराम बीज’ सोहळा उत्साहात संपन्न

हिवरपुरी हनुमान मंदिरात ‘तुकाराम बीज’ सोहळा उत्साहात संपन्न

336

खैरे कुणबी समाजातर्फे आयोजन

 चंद्रपूर : स्थानिक हिवरपुरी हनुमान मंदिर परिसरात सोमवार, २ फेब्रुवारी रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. खैरे कुणबी समाजाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात तुकोबारायांच्या विचारांचा जागर करण्यात आला.

.      कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिक आणि समाजबांधवांनी महाराजांच्या गाथेतील अभंगांचे महत्त्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले. संतांच्या शिकवणीतूनच समाज प्रगती करू शकतो, असा सूर याप्रसंगी उमटला.

.      या सोहळ्याला खैरे कुणबी समाजातील नागरिक आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात हा उत्सव पार पडला.

error: Content is protected !!