युवा प्रतिष्ठानतर्फे भव्य कीर्तन सोहळा
नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
चंद्रपुर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी (बु.) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त युवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सोपानदादा कनेरकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, नंदोरी (बु.), तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे होणार आहे.
![]()
. युवा प्रतिष्ठान नंदोरी (बु.) हे या सोहळ्याचे आयोजक आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या कीर्तन सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


