Home सामाजिक वरोराची कन्या वेदिका भोयरची राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गरुडझेप

वरोराची कन्या वेदिका भोयरची राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गरुडझेप

359

वरोरा : बारामती येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय कराटे शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२०२६ मध्ये वरोरा येथील फौजी वॉरियर्स मार्शल आर्ट सेंटर आणि आनंद निकेतन महाविद्यालयाची विद्यार्थिनी वेदिका गुणवंत भोयर हिने आपल्या कौशल्याचे नेत्रदीपक प्रदर्शन करत राष्ट्रीय स्तरावर द्वितीय स्थान पटकावून रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे.

.       वेदिका गुणवंत भोयर च्या या घवघवीत यशामुळे वरोरा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वेदिकाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशाचे श्रेय तिने तिचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले आहे.

मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव
वेदिकाच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल विनय बोडे (अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षक, जुनसेई शोतोकन कराटे असोसिएशन, भारत), फौजी वॉरियर्स मार्शल आर्ट सेंटरचे मुख्य प्रशिक्षक रवी चरूरकर, अध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण चिमुरकर (बी.एस.एफ.), समन्वयक डी.एन. खापने (भा. वायू सेना), सचिव रवि तुराणकर, हेमराज बेहरे (भा. स्थल सेना), गुरुवर्य राजू नकवेजी, मास्टर वैभव खारकर आणि घनश्याम खोंडे यांनी तिचे अभिनंदन केले.

.        तसेच आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद, शहरातील मार्शल आर्ट क्रीडाप्रेमी आणि पालकवर्गाने वेदिकाच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!