Home सामाजिक भद्रावती तालुका क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीला सुरुवात

भद्रावती तालुका क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीला सुरुवात

383

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीला यश

प्रशासनाकडून साफसफाई आणि खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग

खेळाडू अन् भरती उमेदवारांना मिळणार दिलासा

भद्रावती : येथील तालुका क्रीडा संकुलातील दुरवस्थेमुळे खेळाडू आणि पोलीस-मिलिटरी भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लावून धरली होती. या पाठपुराव्याला यश आले असून, प्रशासनाने संकुलातील दुरुस्ती व स्वच्छतेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.

.        तालुका क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता, मैदानावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते आणि विद्युत व्यवस्थेचाही अभाव होता. यामुळे सराव करणाऱ्या उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली होती. या गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांच्या नेतृत्वात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.

.        या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने आता जेसीबी व अन्य यंत्रणेच्या साहाय्याने मैदानातील खड्डे बुजविणे आणि कचरा सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या कामामुळे शहरातील खेळाडूंना लवकरच एक सुसज्ज मैदान उपलब्ध होईल. प्रशासनाने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाबद्दल जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांनी आभार व्यक्त केले असून, या सुविधेचा फायदा सर्वच खेळाडूंना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!