आ. मुनगंटीवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती
दुसऱ्याच दिवशी थेट तीन चाकी सायकल घरी उपलब्ध
आ. मुनगंटीवार यांनी तत्काळ दखल घेतल्यामुळे बालाजी वाढई यांना दिलासा
चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील आणि तत्पर नेतृत्वाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. एका दिव्यांग नागरिकाने केलेली भावनिक विनंती आमदार मुनगंटीवार यांनी अवघ्या २४ तासांच्या आत पूर्ण करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे.
. मुल तालुक्यातील मारोडा येथील रहिवासी असलेले दिव्यांग नागरिक बालाजी सुखदेव वाढई यांनी ९ जानेवारी २०२६ रोजी मारोडा येथे आयोजित मोफत रेती वाटप कार्यक्रमात आमदार मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. “दिव्यांगत्वामुळे दैनंदिन हालचालींसाठी मला खूप अडचणी येतात, तरी एक तीन चाकी सायकल मिळावी,” अशी आर्त साद त्यांनी घातली होती. ही मागणी साधी असली तरी बालाजी यांच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची होती, आमदार मुनगंटीवार यांनी मनापासून ऐकून घेतली.
. आमदार मुनगंटीवार यांनी या विनंतीची तात्काळ दखल घेत प्रशासकीय चक्रे फिरवली. विशेष म्हणजे, अवघ्या एका दिवसात म्हणजे १० जानेवारी २०२६ रोजी मागणीप्रमाणे तीन चाकी सायकल थेट मारोडा येथे बालाजी वाढई यांच्या घरी उपलब्ध करून देण्यात आली. आमदारांच्या या तत्परतेमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
. अवघ्या २४ तासांत सायकल हाती आल्याने बालाजी वाढई यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ही केवळ भौतिक मदत नसून एका संवेदनशील लोकप्रतिनिधीने दिव्यांगाच्या वेदनेला दिलेला माणुसकीचा स्पर्श आहे. या मदतीबद्दल बालाजी यांच्या आईने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे डोळ्यांत आनंदाश्रू आणून आभार मानले. “अशा संवेदनशील नेत्यांमुळेच आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास अधिक घट्ट होत आहे,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.


