वरोरा : सनय बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा संचालित सुर्ला (बोर्डा) येथील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात १० जानेवारी २०२६ रोजी पालक सभा आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्य समस्या आणि ग्रामीण विकासाच्या संधी यावर चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर खरवडे होते. प्रमुख मार्ग दर्शक म्हणून उपस्थित अस लेल्या प्रा. प्रशांत कडू यांनी ‘शाश्वत ग्रामीण विकास’ या विष या वर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. नरेंद्र चौधरी यांनी ‘शाश्वत विकास आव्हाने आणि संधी’ या विषयावर आपले विचार मांडले. ग्रीन लाईफ सोल्युशन नागपूरचे संचालक अमित देवतळे यांनी ‘शाश्वत विकास आणि अपरंपरागत ऊर्जा स्त्रोत’ या विषयावर बोलताना शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या आणि आर्थिक प्रगती साधण्याच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. टोंगे, प्रा. सुनील खरवडे, प्राचार्य दिनकर गुरनुले आणि पालक प्रतिनिधी म्हणून मंगेश पोले उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रवीणकुमार शेंडे याची विद्युत सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
. कार्यक्रमाचे संचालन प्रा. भारती पाटील यांनी केले, तर प्रा. दीपक खा म णकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. कोरडे, प्रा. झाडे, प्रा. कापसे, प्रा. खंडाळकर, तुषार कडू आणि हर्षद ढव स यांनी सहकार्य केले. या मे ळाव्याला परिसरातील शेतकरी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


