ताडोबातील वाघ देखील हनुमानाचे भक्त
मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी वाघांनी घेतली आपल्या खांद्यावर
करण ठाकरे
चंद्रपूर : माणसेच हनुमानाची भक्ती करतात असे नाही, तर ताडोबातील वाघ देखील हनुमानाचे भक्त आहेत आणि म्हणूनच हनुमान मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ताडोबात कायम हे दृश्य दिसते. मंदिराची सुरक्षा करणाऱ्या वाघाचा हा क्षण पर्यटकाने कमेऱ्यात टिपला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या नवनव्या करामती दररोज समोर येत असतात. या व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील प्राचीन रामदेगी मंदिरात नेहमीच वाघोबा हनुमानाचे दर्शन घेताना दिसून येतात.
वाघोबा घेतात हनुमानाचे दर्शन ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या नवनव्या करामती दररोज समोर येत असतात. या व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील प्राचीन रामदेगी मंदिरात नेहमीच वाघोबा हनुमानाचे दर्शन घेताना दिसून येतात. कित्येकदा ते हनुमानाला प्रदक्षिणा घालतात. मात्र, काही दिवसांपूर्वी एक नाही तर दोन वाघांनी हनुमानाला चक्क प्रदक्षिणा घातली आणि तेथेच ठाण मांडले. दरम्यानच्या काळात अस्वलाने सुद्धा हनुमान भक्तीचा परिचय दिला.
जेव्हा वाघ आणि अस्वल होतात हनुमंताच्या दारी नतमस्तक ! मग काय ! त्या आवाजाचा मोह अस्वला ला आवरला नाही आणि एकदा नाही तर दोनदा, तीनदा त्याने चक्क घंटी वाजवली. निघताना पुन्हा हनुमानाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन घंटी आणि घंटी वाजवून ते अस्वल तिथून बाहेर पडले. पर्यटकांसाठी ही बाब आश्चर्यका रकच होती, पण स्थानिक तसेच खात्यातील कर्मचाऱ्यांच्या मते बरेचदा अस्वल शेंदुराच्या वासाने आकर्षित होतात आणि मग ते खाण्यासाठी ते येतात. मा त्र, याठिकाणी अस्वलाने ते शेंदूर खाल्ले नाही तर चक्क हनुमानसमोर ते नतमस्तक झाले. आताही पुन्हा एकदा हनुमानसमोर नतमस्तक झालेला आणि हनुमानाची सुरक्षा करणारा वाघ पर्यटकांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपला. ताडोबा – अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या देवाडा क्षेत्रात हनुमानाचे एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिरात वाघ नेहमीच येतात. शनिवारी देखील एका वाघाने मंदिराला प्रदक्षिणा घातली. हनुमानसमोर तो नतमस्तक झाला आणि मग मंदिराच्या सुरक्षेसाठी तो मंदिराच्या वर जाऊन बसला. पर्यटकांनी हा क्षण अलगद कॅमेऱ्यात टिपला.
अस्वलाला हनुमानसमोर नतमस्तक होण्याचा मोह आवरला नाही ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या देव्हाडा बफर क्षेत्रात हनुमानाचे एक मंदिर आहे. हनुमानाची एक छोटीशी मूर्ती आणि त्याच्याच समोर एक छोटी घंटी लावलेली आहे. कदाचित माणसे याठिकाणी फारशी येत नसावीत. मात्र, अस्वलाला हनुमानसमोर नतमस्तक होण्याचा मोह आवरला नाही. जंगलातून भटकत आलेले अस्वल हनुमानाच्या त्या छोट्याशा मंदिरात शिरले. त्याला नीट आतही जाता येत नव्हते, पण तरीही त्या अस्वलाचने आत शिरण्या चा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न करत असताना मंदिरातील घंटी त्याच्या डोक्याला लागली.
रामदेगीचे ‘रक्षक’ वाघोबा ताडोबाच्या बफर क्षेत्रात वसलेले प्राचीन रामदेगी मंदिर हे वन्यजीवांचे आवडते ठिकाण बनले आहे. या परिसरात वाघांचा वावर नवीन नाही, मात्र त्यांच्या काही कृती भाविकांना चकित करणाऱ्या आहेत. काही दिवसांपूर्वी दोन वाघांनी चक्क हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर तिथेच ठाण मांडले. जणू काही या ‘मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी’ त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे, असे दृश्य तिथे पाहायला मिळाले. स्थानिक आणि पर्यटकांच्या मते, हे वाघ अनेकदा मंदिराच्या परिसरात शांतपणे वावरताना दिसतात, जे त्यांच्या एका वेगळ्या आणि शांत रूपाचे दर्शन घडवते.


