गुरुदेव सेवा मंडळाचे आयोजन
भजन संमेलन व पालखी मिरवणूक कार्यक्रम आयोजित
बल्लारपूर : येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन शनिवार (दि. 3) व रविवार (दि. ४) जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. स्थानिक विश्वकर्मा भवन, सार्वजनिक हनुमान मंदिर समोर विवेकानंद वार्ड येथे आयोजित कार्यक्रमात भजन संमेलन व पालखी मिरवणूक विशेष आकर्षण राहणार आहे.

शुभेच्छुक : अंबरभाऊ अशोक जिवतोडे, सामाजिक कार्यकर्ते, नंदोरी-मांगली, जि. प. क्षेत्र
. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ शनिवार ला सकाळी ६ वाजता सामुदायिक ध्यान व प्रार्थना करून होणार आहे. यावेळी विश्वशांतीसाठी होम,हवन व पुजाअर्चना करून घटस्थापना करण्यात येत आहे. सकाळी १0 वाजता पासून राष्ट्रसंतांच्या विचारावर आधारित भजन संमेलन होणार असून तालुक्यातील विविध भजन मंडळाचा यात सहभाग असणार आहे.

शुभेच्छुक : आर. बी. इन्फ्रा, गजानन झाडे, संजय पुनवटकर
. रविवारी सकाळी ६ वाजता प्रा. डॉ. श्रावण बानासुरे यांचे सामुदायिक प्रार्थना दरम्यान चिंतन प्रवचन होणार आहे. सकाळी ८ वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवांतर्गत प्रतिमेची पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीत गुरुदेव भक्तांसह विविध भजन मंडळाचे सहकार्य लाभणार आहे. दरम्यान दुपारी १ वाजता चंद्रपूर जिल्हा गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी ॲड. दत्ता हजारे, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ, दादाजी नंदनवार, मोहनदास मेश्राम यांच्या उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यांनतर अमरावती जिल्हा गुरूकुंज मोझरी येथील आकाश ताविडे महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन होणार आहे.
. सदर कार्यक्रमाचा गुरुदेव भक्तांनी व जनतेनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी भास्कर डांगे, जेष्ठ प्रचारक गंगाराम धोटे, श्रीराम वर्हाडे, बल्लारपूर तालुका महिला प्रमुख अरुणा डांगे, भजन संमेलन प्रमुख दीपक मेश्राम यांच्यासह अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.


