Home सामाजिक नंदोरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा

नंदोरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा

446

तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी बु. येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. आज १ जानेवारी २०२६ पासून या तीन दिवसीय सोहळ्याला प्रारंभ होत असून, परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

नंदोरी-मांगली जिल्हा परिषद क्षेत्रातील माझ्या सर्व लाडक्या माता-भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांना नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
शुभेच्छुक : अंबरभाऊ अशोक जिवतोडे, सामाजिक कार्यकर्ते, नंदोरी-मांगली, जि. प. क्षेत्र

.       राष्ट्रसंतांच्या विचारांचा वारसा आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही १, २ आणि ३ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण शुक्रवार, २ जानेवारी ला रात्री ८ वाजता असणार आहे. सामाजिक कार्यकर्ते अंबर जिवतोडे यांच्या वतीने प्रसिद्ध कीर्तनकार क्रांती मंगेश काळे यांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सर्वे जनतेला नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
शुभेच्छुक : आर. बी. इन्फ्रा, गजानन झाडे, संजय पुनवटकर

.       या तीन दिवसांच्या कालावधीत सामुदायिक प्रार्थना, भजनांचे कार्यक्रम, प्रवचन आणि ग्रामगीतेवर आधारित प्रबोधनपर उपक्रम राबविले जाणार आहेत. या आध्यात्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण नंदोरी परिसर गुरुदेव भक्तीने न्हाऊन निघाला आहे.

.       या महोत्सवाची सांगता भव्य महाप्रसादाने होणार आहे. तरी नंदोरी बु. आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या ५७ व्या पुण्यस्मरण सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ, नंदोरी बु. आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!