वरोरा : श्री गुरूदेव सेवा मंडळ परसोडा व सर्व ग्रामस्थांच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी तसेच कर्मयोगी संत तुकारामदादा गिताचार्य यांची जयंती २१ व २२ डिसेंबर रोजी परसोडा येथे विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली.
. पहिल्या दिवशी पहाटे घटस्थापना व ज्ञानप्रार्थना करण्यात आली. यानंतर ग्रामविकास ग्रामीण रोजगार बांधकाम कामगार संघटनेतर्फे बांधकाम कामगार पेटी नोंदणी व नूतनीकरण, दुचाकी व चारचाकी वाहन परवाना कॅम्प घेण्यात आला. महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रात्री ह.भ.प. जयश्री राकेश गावतुरे यांच्या कीर्तनातून व्यसनमुक्ती व राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात करण्याचा संदेश देण्यात आला.
. दुसऱ्या दिवशी गुरूदेव सेवा मंडळ, भजन मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने ग्राम सफाई व रामधुन काढण्यात आली. रामधुननंतर गुरुभक्त सुधाकर गोवारदिपे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर भजन कार्यक्रम पार पडला. डॉ. बिपटे यांच्या मार्गदर्शनाखाली जनावरांचे लसीकरण व तपासणी, तर डॉ. मयुरी सेगोकर (आरोग्य समुदाय अधिकारी, जामगाव खुर्द) यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची आरोग्य तपासणी, बीपी व शुगर तपासणी करण्यात आली.
. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती राजू चिकटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद नागापुरे (सामाजिक कार्यकर्ता, वरोरा), गजानन जिवतोडे (नवनिर्वाचित नगरसेवक, वरोरा), प्रविण बदकी (सामाजिक कार्यकर्ता, बोर्डा सुरळा) उपस्थित होते. यावेळी रमेश पावडे (उपसरपंच), वैशाली कुरेकार (पोलीस पाटील), वाघु मडावी (तंटामुक्ती अध्यक्ष), सुनील कुरेकार, ललिता कळसकर, रूपाली मडावी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश पावडे यांनी केले. सूत्रसंचालन जि.प. उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका झाडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप कळसकर, संदीप कळसकर, विजय कळसकर, गोविंदा खिरटकर, संभाजी घोसरे, चंद्रकांत राजूरकर, राजू डाखोरे, संभाजी पावडे, विकास कळसकर, सूर्यभान गारघाटे, गणपत चामाटे, सचिन बेलेकर, नारायण पावडे यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


