Home सामाजिक संकोचाला थारा न देता निर्भय होत उंच भरारी घ्या !

संकोचाला थारा न देता निर्भय होत उंच भरारी घ्या !

416

डॉ. निता लांबे यांचा स्पर्धकांना सल्ला

बल्लारपुरात पार पडली जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धा

बल्लारपुर : आपण मुली आहोत, याचा मनात संकोच ठेऊ नका. निर्भयपणे स्पर्धेला सामोरे जा.आपल्यातील कलाकौशल्याचे आत्मविश्वासाने सादरीकरण करा. यातूनच उंच भरारी घ्या, असा मौल्यवान सल्ला नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले काॅलेज आफ आर्किटेक्चर प्राचार्य डॉ. नीता लांबे यांनी बल्लारपूर येथे जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालय लोकनृत्य स्पर्धेच्या उदघाटन समारंभ दरम्यान मंगळवारी केले.

.         बल्लारपूर येथील एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या वतीने स्थानिक नाट्यगृहात जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण १६ महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी सहभाग घेऊन लोकनृत्य अविष्काराचे उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उदघाटक म्हणून डॉ. नीता लांबे बोलत होत्या.

.        यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर येथील एम. आय. डी. सी. इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, एस. एन. डी. टि. महिला विद्यापीठाचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अश्विनी वाणी यांची उपस्थिती होती.

.        दरम्यान विद्यार्थ्यांनीनी सादर केलेल्या लोकनृत्यांचे परीक्षक म्हणून नृत्य दिग्दर्शक डॉ. मानस रामटेके, रूपाली खाडीलकर, रूपाली भगत यांनी काम पाहिले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर, द्वितीय क्रमांक शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवाडा, तर तृतीय क्रमांक डॉ. खत्री कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथील चमुंनी पटकावला.

.         विजेत्या स्पर्धकांना बीजीपिपीएलचे व्यवस्थापक प्रविण शंकर, लायड मेटल अंड एनर्जी सहाय्यक महाव्यवस्थापक विद्या पाल व अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रजनी पाल यांनी केले. आभार प्रा.अश्विनी वाणी यांनी मानले. यावेळी लोकनृत्य स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

error: Content is protected !!