Home सामाजिक केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत पानवडाळा शाळेचे घवघवीत यश

केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत पानवडाळा शाळेचे घवघवीत यश

459

भद्रावती : तालुक्यातील नंदोरी (बु.) येथे दि.१९ डिसेंबर २०२९ रोजी पार पडलेल्या केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पानवडाळा येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले. पानवडाळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत मिळविलेले यश गौरवास्पद असल्याचे मत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करून सरपंच प्रदीप महाकुलकर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

.      प्राथमिक गटातून कथाकथन स्पर्धेत वैभव संतोष पिंपळकर याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच एकपात्री अभिनय स्पर्धेत ईशानी नितेश बोथले हिने उल्लेखनीय कामगिरी केली. माध्यमिक गटातून कथाकथन व वादविवाद स्पर्धेत रुद्र पिंपळकर याने प्रथम क्रमांक मिळविला. चित्रकला स्पर्धेत भार्गवी घोसरे हिने प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या यशात भर घातली. तर एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धेत आदित्य वसंत घोसरे याने द्वितीय क्रमांक मिळविला.

.      या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश बोथले, समितीचे सदस्य तसेच ग्रामपंचायत पानवडाळाचे सरपंच तथा भद्रावती तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप महाकुलकर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!