Home सामाजिक चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी वसंत विधाते तर उपाध्यक्षपदी प्रा. उज्वला हांडेकर

चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी वसंत विधाते तर उपाध्यक्षपदी प्रा. उज्वला हांडेकर

446

मुल : चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्ड लि. चंद्रपूर सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधी करिता १५ संचालकांची व नंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक अविरोध झाली. नवनिर्वाचित संचालक मंडळाची प्रथम सभा नुकतीच चंद्रपूर बोर्डाच्या कार्याल‌यात एस. के. बगडे, अध्यासी अधिकारी यांचे उपस्थित पार पडली.

.       यात अध्यक्षपदी वसंत विधाते व उपाध्यक्षपदी उज्वला तेजराम कापगते यांची अविरोध निवड करण्यात आली. सदर निवडणुकीत महिला राखीव गटातून उज्वला कागते, अर्चना जीवतोडे, अनुसूचित जाती/जमाती गटातून भोजराज गोवर्धन, इतर मागासवर्गीय गटातून लहू कडसकर, भटक्या जाती गटातून दामोदर रुयारकर, तर तालुका गटातून चंद्रपूर तालुका दिनेश चोखारे, वरोरा तालुका वसंत विधाते, मुल बल्लारपूर तालुका दिलीप तालुका निपचंद शेरकी, पारखी, राजुरा तालुका राम नंदेश्वर गिरडकर, भद्रावती तालुका विलास जोगी, चिमूर तालुका दुर्योधन तांबरभोगे, सावली तालुका विशाल बिके, नागभीड तालुका युवराज आकरे, पोम्पूर्णा तालुका विनायक बुरांडे यांची अविरोध निवड झाली. तसेच याप्रसंगी मावळते अध्यक्ष तेजरामजी कापगते प्राचार्य यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

.       नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक यांचे नरेंद्र पिंपळकर, जिल्हा सहकार विकास अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!