नवबौद्ध शासकीय शाळेत गौरव पंधरवडा
विविध उपक्रमाचे करण्यात आले आयोजन
बल्लारपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध शासकीय निवासी शाळेत जनजातीय गौरव पंधरवडा साजरा करण्यात आला. या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक महोत्सव दरम्यान आदीवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.
. येथील जनजातीय पंधरवडा कार्यक्रमाचे उदघाटन विसापूरचे केंद्र प्रमुख नागेंद्र कुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुसूचित जाती व नवबौद्ध शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापक बबिता हुमने होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून उद्धव वलके, गृहपाल शेंडे, मंगला मंडपे, चेतन चौधरी, पुनम बेताल,गोहणे यांची उपस्थिती होती.
येथे आयोजित विविध कार्यक्रम दरम्यान विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक महोत्सवात आदीवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.
. आदिवासींच्या इतिहासावर आधारित माहिती पट विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारा ठरला.त्याच प्रमाणे भितीचित्र रेखाटून आदीवासी संस्कृतीचे जीवंत दर्शन घडविले. लोकनृत्य व लोकगीत स्पर्धेत विद्यार्थी चमकले. आदीवासी क्रांतीकारकांच्या इतिहासाचा उलघडा वक्तृत्व स्पर्धेतून झाला. क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित नाटकाच्या सादरीकरणाने अंतर्मुख होण्यास भाग पाडले. कार्यक्रमाचे संचालन अनुष वनकर यांनी, तर आभार प्रदर्शन प्रशील खोब्रागडे यांनी केले.


