Home सामाजिक भद्रावतीत २४ नोव्हेंबर ला साइबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

भद्रावतीत २४ नोव्हेंबर ला साइबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

720

भद्रावती : शीलभद्र मंडळ गौतम नगर, भद्रावती यांच्या वतीने अशोक बुद्ध विहाराच्या पटांगणावर दि.२४ नोव्हेंबर रोज सोमवारला सायंकाळी सहा वाजता संविधान सन्मान समारोह कार्यक्रमानिमित्त साइबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

.       या कार्यक्रमाला साइबर एक्सपर्ट मुजावर अली मुख्यत्वे उपस्थित राहणार असून पोक्सो कायदा, सायबर सुरक्षितता, ऑनलाईन गेमींग, बनावट ॲप वरील ट्रेडींग मुळे होणारे नुकसान आणि मोबाईलच्या जास्त वापरामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तरी समस्त भद्रावतीकरांनी, पालकांनी आपल्या मुलांसोबत जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन शिलभद्र मंडळ गौतम नगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

error: Content is protected !!