समाजपरिवर्तक तथा माजी उपसरपंच विठ्ठलजी हनवते यांची प्रमुख उपस्थिती
भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथे मेरा युवा भारत चंद्रपूर (युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार)
व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच धरतीचे आबा, क्रांतिविर, जननायक, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
. यावेळी चंदनखेडा येथील समाजपरिवर्तक विठ्ठल रामकृष्ण हनवते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर शालिक हनवते, पोलिस पाटील समीर खान पठाण, प्रभाकर दोडके, सुधाकर दोडके, गजेंद्र रणदिवे, फिरोज पठान, सिंगलदिप पेंन्दाम, उमेश घोडाम हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
. या कार्यक्रमात बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाचे सदस्य गणेश हनवते, मंगेश हनवते, शौर्य क्रिडा मंडळाचे अध्यक्ष आशिष हनवते, राहुल कोसुरकार, माधव दोडके, नंदकिशोर जांभुळे, मिलिंद पांढरे, विठ्ठल महागमकार, कुणाल ढोक, शंकर दडमल, पंकज दडमल, बंडु दडमल, वैशाली दडमल, दिलिप ठावरी, देवानंद दोडके, स्वप्निल दडमल, अमोल महागमकार, प्रज्वल हनवते, बबलु शेख, हुसेन शेख, भोला पेटकर, प्रमोद राखुंडे, लहु राखुंडे, संतोष गायकवाड, सुरेश हनवते, कवडु दडमल, ईश्वर दडमल, निमेश नन्नावरे, अक्षय नन्नावरे, उद्धव नन्नावरे, जित कोकुडे, प्रक्षित नन्नावरे, ओमकार राखुंडे, मेरा युवा भारत चंद्रपूर चे माजी तालुका समन्वयक आशिष हनवते यांच्यासह फार मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते.


