ब्रह्मपुरी येथील संघटनांकडून आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार

41

ब्रम्हपुरी

.          विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ , मुख्याध्यापक संघ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , आणि जुनी पेन्शन हक्क संघटन ब्रम्हपुरी यांचे वतीने नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार सोहळा स्वागत मंगल कार्यालय ब्रम्हपुरी येथे पार पडला.

.          या कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णु तोंडरे अध्यक्ष मुख्याध्यापक संघ ब्रम्हपुरी, हे होते तर प्रमूख अतिथी म्हणून श्रीहरी शेन्डे,जिल्हा कार्यवाह विमाशि संघ चंद्रपूर, सुनिल शेरकी जिल्हा उपाध्यक्ष विमाशि संघ चंद्रपूर अजय लोंढे जिल्हा कार्यवाह विमाशी गडचिरोली, ठाकरे जगदिश उपाध्यक्ष जिल्हा मुख्याध्यापक संघ चंद्रपूर भाऊराव राऊत, रामदास आलेवार,धनंजय राऊत,संघटक विमाशी चंद्रपूर प्रा बालाजी दमकोडवार, श्रीअनंत ढोरे, प्रविण नाकाडे, हेमंतकुमार किंदर्णे, भोजराज खोब्रागडे,आणि अन्य मान्यवर तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

.          यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सत्कारमुर्ती सुधाकर अडबाले यांनी सत्काराला उत्तर देतांना सर्वच संघटना चे आभार मानून सदैव शिक्षकाच्या पाठिशी उभे राहून शेवट पर्यंत अन्यायकारक धोरणाविषयी सभागृहात आवाज उठविण्याचे आश्वासन देऊन जुनी पेन्शन चा लढा वोट फार ओपिएसच्या निर्णयास सक्रिय पाठींबा दर्शविला, सरकारचे कत्राटीकरण मराठी शाळा बंद करण्याचा धोरणाचा निषेध नोंदवून तीव्र लढा उभारण्यात येईल सर्व संघटनानी ह्या लढ्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विमाशि तालुका अध्यक्ष भोजराज खोब्रागडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी ठेंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र हटवार तालुका विमाशि सचिव यानी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रूपेश पुरी, अतुल कानझोडे किशोर वानखेडे, संजय हटवार, दाते, दिपक यादव, साखरे, तसेच तिन्ही संघटनेने प्रयत्न केले.