Home सामाजिक चंदनखेडा येथे विठ्ठल हनवते यांच्या वाढदिवसानिमित्त ७९ युवकांनी केले रक्तदान

चंदनखेडा येथे विठ्ठल हनवते यांच्या वाढदिवसानिमित्त ७९ युवकांनी केले रक्तदान

498

भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथे गुरुदेव प्रार्थना मंदिर परिसरात आज दि.६ नोव्हेंबर रोज गुरुवार ला समाज परिवर्तक तथा माजी उपसरपंच विठ्ठल रामकृष्ण हनवते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी ७९ युवकांनी स्वयंस्फूर्तीने येवून रक्तदान केले. सर्वच रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ,पाणी कॅन देवुन सन्मान करण्यात आला.

.      विठ्ठल रामकृष्ण हनवते मित्र परिवार व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट, शौर्य क्रिडा मंडळ, बिरसा बचत गट कोकेवाडा (मा), विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर (धा) व समस्त गावकरी यांच्या संयुक्त समाज परिवर्तक तथा माजी उपसरपंच विठ्ठल रामकृष्ण हनवते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीर व रक्तदात्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने राजमाता मानिका पुजन करण्यात आले. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते यांचे हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

.       याप्रसंगी अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष नागोराव ठावरी, प्रमुख अतिथी पोलिस पाटील समीर खान पठाण, सुशिला हनवते, लताताई नन्नावरे, विकास दोहतरे, गुलाब भरडे, दयानंद जांभुळे, संतोष हनवते,प्रमुख मार्गदर्शक समाजसेवा अधिक्षक राकेश शेंन्डे आणी रक्त केंद्र तंत्रज्ञ अमोल रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच विठ्ठल हनवते यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व पुष्पगुच्छ, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो व ग्रामगीता देवुन सत्कार करण्यात आला.

.      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल हनवते. सुत्रसंचालन गणेश हनवते व आभार शुभम भोस्कर यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट, शौर्य क्रिडा मंडळ, महात्मा गांधी तंटामुक्त समिती, बिरसा बचत गट कोकेवाडा, विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर धा गुरुदेव सेवा मंडळ व समस्त गावकरी चंदनखेडा आशिष हनवते, महेश केदार, अमोल दडमल,रोशन मानकर, राहुल चौधरी, जगदिश निमजे, देवानंद निमजे, आकाश निमजे, महेंद्र गुरुनुले, राहुल कोसुरकार , स्वप्निल दडमल, भुषण वाटेकर, शंकर दडमल, दिलिप ठावरी, प्रज्वल बोढे, प्रमोद हनवते, स्वप्निल चौखे, आशिष बारतीने, अनिल हनवते, हुसेन शेख, रमाकांत दोहतरे, प्रकाश भरडे, अनिल भरडे, राकेश सोनुले, महेश सोनुले, स्वप्निल सोनवणे, देवानंद दोडके, अमोल महागमकार, वैभव गटलेवार, देविदास चौखे, मंगेश चौखे, मंगेश हनवते, पंकज मानकर, अजित हनवते, निखिल चौखे, रोहित केदार, वैभव झाडे, मयुर जांभुळे, सचिन श्रिरामे, अमर श्रिरामे, शरद केदार, हरिदास केदार, तन्मय झाडे, शुभम चौधरी, ईश्वर उरकांडे, अविनाश डुकसे, समिर मडावी, अंकित मानकर, आशिष हनवते यांच्या परस्पर सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

error: Content is protected !!