चंद्रपूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिवीत सक्रीय बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तु संच वाटप हे प्लॉट नं. १-४, एम.आय.डी.सी. चंद्रपूर इंडस्ट्रिअल एरिया, चंद्रपूर येथे सुरू आहे. तरी बांधकाम कामगाराने ऑनलाईन पध्दतीने भेट देऊन निश्चित दिनांक (Appoinment ) करीता नोंदणी करावी. असे आवाहन सहायक कामगार आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत करण्यात आले आहे.


