बल्लारपूर : विधानसभा क्षेत्रातील नागपूर पदवीधर मतदार नोंदणी मुदत येत्या गुरुवार ( दि. ६ ) नोव्हेंबर पर्यंत आहे. पात्र पदवीधर मतदारांनी आपली मतदार म्हणून नोंदणी विहीत नमुन्यात करून घ्यावी,असे आवाहन बल्लारपूर तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी रेणुका कोकाटे यांनी केले आहे.
. भारत निवडणूक आयोग यांच्या वतीने नागपूर विभागात पदवीधर मतदारांची नोंदणी अधिनियम १९६0 चे नियम 31 ( ४ ) अन्वये विधानपरिषद निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी पदवीधर मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. याची माहिती निवडणूक आयोग संकेत स्थळावर उपलब्ध आहे. पदवीधर धारक मतदारांनी नमुना १८ मध्ये माहिती भरुन नागपूर विभागात पदवीधर मतदार म्हणून नोंदणी येत्या गुरुवार पर्यंत करून घ्यावी. आपले मतदार म्हणून नोंदणी झाल्याची खात्री करून घ्यावी, असे आव्हान बल्लारपूर येथील तहसिलदार रेणुका कोकाटे व नायब तहसिलदार महेंद्र फुलझेले यांनी केले आहे.


