Home सामाजिक विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांचा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सन्मान

विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांचा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सन्मान

552

ग्रामगीता ग्रंथ व माता महाकालीची मूर्ती भेट देऊन सन्मानित

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली. या भेटीदरम्यान बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ‘ग्रामगीता’ ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

.      या वेळी बँकेचे संचालक ललित मोटघरे, नंदाताई अल्लुरवार तसेच बँकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यावतीने महानगर अध्यक्ष सुभाष कासमगोट्टीवार यांनीही माता महाकालीची मूर्ती भेट देऊन आमदार संजय खोडके यांचा सन्मान केला.

error: Content is protected !!