Home सामाजिक भद्रावतीत रोटरी क्रीडा उत्सव व दिवाळी मेळा 2025 उत्साहात

भद्रावतीत रोटरी क्रीडा उत्सव व दिवाळी मेळा 2025 उत्साहात

549

उद्घाटनप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांची उपस्थिती

भद्रावती : रोटरी क्लब, भद्रावती यांच्या वतीने आयोजित “रोटरी क्रीडा उत्सव व दिवाळी मेला 2025” या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूरचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि सामाजिक ऐक्य वाढवणाऱ्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे.

.      या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील नामोदवार, तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य आणि भद्रावतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.      कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांनी क्रीडा आणि दिवाळी मेळ्याचे उद्घाटन केले. विविध क्रीडा स्पर्धा, स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.

.      रोटरी क्लबच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणत समाजात बंधुतेचा आणि सकारात्मकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.

error: Content is protected !!