Home सामाजिक धम्मचक्र अनुवर्तन दिन सोहळा समिती भद्रावती तर्फे अनुवर्तन सोहळा संपन्न

धम्मचक्र अनुवर्तन दिन सोहळा समिती भद्रावती तर्फे अनुवर्तन सोहळा संपन्न

800

हजारो बौद्ध अनुयायांनी दर्शवली उपस्थिती

भद्रावती : १४ ऑक्टोबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या असंख्य अनुयायाना बौद्ध धर्माची दिक्षा देऊन पूर्वापार रूढी परंपरेला फाटा देत स्वाभिमानाने जगण्याचा मूलमंत्र दिला. भारत भूमीवर लुप्त होत चाललेल्या बौद्ध धर्माचे चक्र गतिमान करीत ” धम्मचक्र अनुवर्तन”केले.तेव्हा पासून देशाच्या कानाकोपऱ्यात हा दोन दिवसीय अनुवर्तन दिन, किंवा या दिनाला दिक्षा वर्धापन दिवस म्हणतात साजरा करण्यात येतो.

.     भद्रावती ही बौद्ध धर्मियांचे विशेष श्रद्धास्थान आहे त्या अनुषंगाने विंजासन येथील बौद्ध लेणी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समितीच्या वतीने संगीत रजनी, पंचशील ग्रहण व आरोग्य शिबिरा सह न्यायमूर्ती आशिष बोरकर यांचा सत्कार तसेच भव्य शोभायात्रेचे आयोजन पार पडले.

.      याप्रसंगी चंद्रमणी चंदनखेडे यांचे तर्फे शव पेटी दान देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमात डॉ. अमित नगराळे, अनमोल कोल्हटकर, नितीन देवगडे, विशाल बोरकर, उज्वल रामटेके, विशाल रामटेके, सोनल कोल्हटकर, सर्वेश चंहादे तसेच इतर सर्व भीम सैनिक व कार्यकर्त्यांनी आयोजनात विशेष योगदान दिले.

error: Content is protected !!