Home सामाजिक विसापुरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा

विसापुरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा

571

माजी जि.प.सदस्य रामभाऊ टोंगे यांच्या हस्ते शुभारंभ

मान्यवरांची होती उपस्थिती

बल्लारपूर : तालुक्यात विसापूर सर्वात मोठे गाव असून एकमेव पंचायत समिती गण आहे. येथील लोकसंख्या १६ हजारांवर असून वस्ती विभागात आरो,शुद्ध पाण्याची व्यवस्था नव्हती. ही गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायत परिसरात आरो,शुद्ध पिण्याच्या पाण्याचे सयंत्र लावण्यात आले.यामुळे नागरिकांना नाममात्र दरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. याचे लोकार्पण माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विसापूरचे माजी सरपंच रामभाऊ टोंगे यांच्या हस्ते गुरुवार (दि.१६) आक्टोंबर रोजी करण्यात आले.

.       यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य रिना कांबळे, वैशाली पुणेकर, शशीकला जीवने, ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे, लिपिक संतोष निपुंगे यांची उपस्थिती होती.

.       १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नागरिकांना आरोच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायत नाममात्र शुल्क आकारणार असून वस्ती भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी सुलभ व मुबलक प्रमाणात मिळणार आहे. दरम्यान ग्रामपंचायत तर्फे रामभाऊ टोंगे यांचा शाल व पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संतोष निपुंगे यांनी केले. आभार ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे यांनी मानले. यावेळी गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!