आरक्षण सोडतीत ५६ पैकी २८ जागा महिलांसाठी
अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला राखीव
चिमूर, चंद्रपूर, गोंडपिपरी व राजुरा तालुक्यांना संधी
चंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीत महिलांचे वर्चस्व स्पष्ट दिसून आले असून, तब्बल ५६ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत.
. अनुसूचित जाती प्रवर्गातील ८ पैकी ४, अनुसूचित जमातीतील १३ पैकी ७, मागासवर्गीय प्रवर्गातील १५ पैकी ८ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील २० पैकी ९ जागा महिलांना राखीव मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव असल्याने चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी व राजुरा तालुक्यातील महिलांना या पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय जिल्हा परिषद गटांचे आरक्षण
चिमूर तालुका : आंबोली–सावरगाव (एसटी महिला), शंकर–डोमा (एससी महिला), नवतळा–नेरी (एसटी सर्वसाधारण), गदगाव–खडसंगी (एसटी महिला), मासळ बु.–पळसगाव (एसटी सर्वसाधारण).
नागभीड तालुका : कानपा–मौशी (ओबीसी महिला), पारडी–बाळापूर बुज. (ओबीसी सर्वसाधारण), गोविंदपूर–तळोधी बाळापूर (सर्वसाधारण महिला), गिरगाव–वाढोणा (सर्वसाधारण).
ब्रम्हपुरी तालुका : नान्होरी–अर्हेर नवरगाव (ओबीसी सर्वसाधारण), पिंपळगाव–मालडोंगरी (ओबीसी सर्वसाधारण), खेडमक्ता–चौगान (सर्वसाधारण), गांगलवाडी–मेंडकी (सर्वसाधारण), आवळगाव–मुडझा (सर्वसाधारण).
सिंदेवाही तालुका : नवरगाव–पळसगाव जाट (सर्वसाधारण महिला), गुंजेवाही–सरडपार (ओबीसी सर्वसाधारण), रत्नापूर–शिवणी (सर्वसाधारण), मोहाळी–नलेश्वर–वासेरा (एसटी महिला).
भद्रावती तालुका : चंदनखेडा–मुधोली (एसटी महिला), मांगली – नंदोरी (सर्वसाधारण), कुचना–शिवजीनगर (एससी सर्वसाधारण), कोंढा–घोडपेठ (ओबीसी सर्वसाधारण).
वरोरा तालुका : खांबाडा–चिकणी (सर्वसाधारण महिला), टेमुर्डा–आबमक्ता (एसटी सर्वसाधारण), नागरी–माढेळी (ओबीसी महिला), चरूरखटी–सालोरी (ओबीसी महिला), शेगाव बु.–बोर्डा (सर्वसाधारण).
चंद्रपूर तालुका : दुर्गापूर (एससी महिला), जुनोना (एसटी सर्वसाधारण), कोंडीमाल (एससी सर्वसाधारण), पडोली (एससी सर्वसाधारण), नकोडा (ओबीसी सर्वसाधारण).
मूल तालुका : राजोली–मारोडा (ओबीसी सर्वसाधारण), जुनासुर्ला–बेंबाळ (ओबीसी महिला), चिंचाळा मो.–सुशी दाबगाव (सर्वसाधारण).
सावली तालुका : अंतरगांव–निमगाव (सर्वसाधारण महिला), पाथरी–व्याहाड खुर्द (ओबीसी महिला), बोथली–कवठी (सर्वसाधारण), व्याहाड बुज.–हरंबा (सर्वसाधारण).
पोभूर्णा तालुका : देवाडा खुर्द–केमारा (एसटी सर्वसाधारण), चिंतलधाबा–घोसरी (सर्वसाधारण महिला).
गोंडपिपरी तालुका : करंजी–खराळपेठ (सर्वसाधारण महिला), विठ्ठलवाडा–भंगाराम तळोधी (ओबीसी महिला), तोहगाव–धाबा (एससी महिला).
बल्लारपूर तालुका : विसापूर–बामणी (सर्वसाधारण महिला), कोठारी–पळसगाव (सर्वसाधारण महिला).
कोरपना तालुका : भोयेगांव–आवाळपूर (सर्वसाधारण), उपरवाही–नांदा (ओबीसी महिला), वनसडी–कोडशी बु. (सर्वसाधारण महिला), परसोडा–येरगव्हाण (एसटी महिला).
जिवती तालुका : चिखली बु.–शेणगाव (एसटी महिला), येल्लापूर–कुंभेझरी (एसटी सर्वसाधारण).
राजुरा तालुका : गोवरी–धोपटाळा (एससी महिला), चुनाळा–विरुर स्टेशन (एससी सर्वसाधारण), रामपूर–पाचगाव (ओबीसी महिला), देवाडा–भेंडवी (एसटी महिला).


