Home सामाजिक मिनी मंत्रालयाच्या शिलेदारांसाठी आज आरक्षण सोडत

मिनी मंत्रालयाच्या शिलेदारांसाठी आज आरक्षण सोडत

587

जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात

१५ पंचायत समितीच्या गणांची सोडत तहसील कार्यालयात

बल्लारपूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५६ जिल्हा परिषद सदस्य व १५ पंचायत समितीमधील ११२ सदस्य निवडीसाठी आरक्षण सोडत सोमवार ( दि.13 ) आक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता काढली जाणार आहे. जिल्हा परिषद ५६ गटांची आरक्षण सोडत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे, तर पंचायत समिती चे गणांची आरक्षण सोडत प्रत्येक तहसील कार्यालय मध्ये काढली जणार आहे. विशेष म्हणजे कोणत्या गटासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण निघते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.मिनी मंत्रालयात कोणते शिलेदार जातील, याची उत्सुकता आजच्या आरक्षण सोडतीतून संपुष्टात येणार आहे.

.             चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष पदाचे आरक्षण यापूर्वीच अनुसूचित जाती महिला राखीव झाले आहे. आज ५६ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर करण्यात येत आहे. ५६ जिल्हा परिषद गटांपैकी ८ जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी व 13 जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव राहण्याची शक्यता आहे. यातील 35 जागांपैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण असे आरक्षण राहणार आहे. विशेत: ५६ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव करण्यात येणार असल्याने मिनी मंत्रालयात महिलाराज येणार आहे. ही आरक्षण सोडत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, जागांचे आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम,२0२५ अन्वये अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिलांसाठी राखीव करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे सर्वसाधारण वर्गातून महिलांनाही जागा राखीव करण्यात येणार आहे.

८ जिल्हा परिषद गटांवर साऱ्यांची नजर                                                                                                                                                                                                                                               चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये आगामी अध्यक्ष अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना काढून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण ठरविण्याचे अधिकार विगागीय आयुक्त, नागपूर यांना दिले.त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा परिषद गटांसाठी अनुसूचित जाती प्रवर्ग राखीव म्हणून चंद्रपूर तालुक्यातील २८ – दुर्गापूर, 30- कोंडीमाल, 31- पडोली, राजुरा तालुक्यातील 53- गोवरी – धोपटाळा, 54- चुनाळा – विरुर स्टेशन, चिमूर तालुक्यातील 2- शंकरपूर – डोमा , भद्रावती तालुक्यात 21- कुचना – शिवाजीनगर व गोंडपिपरी तालुक्यातील ४४ – तोहगांव – धाबा असे ८ जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती प्रवर्ग करिता राखीव असल्याची माहिती दिली आहे. ८ जिल्हा परिषद गटांपैकी ४ महिलांसाठी राखीव करण्यात येत आहे. यामुळे यातील कोणते ४ गटांचे आरक्षण सोडत महिलांसाठी राखीव राहतील, यांकडे जिल्ह्यातील राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.याच गटातून विजयी महिलेच्या गळ्यात आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची माळ पडणार, असल्याची माहिती आहे.

असे आहेत तालुका निहाय जि.प.गट.

तालुका – जिल्हा परिषद गट

1) चिमूर – आंबोली – सावरगांव,शंकरपूर – डोमा,नवतळा – नेरी,गदगांव – खडसंगी, मासळ बु. – पळसगाव.

2) नागभीड – कानपा – मौशी,पारडी – बाळापूर बुज., गोविंदपूर – तळोधी बा., गिरगांव – वाढोणा.

3) ब्रम्हपुरी – नान्होरी – अर्हेर नवरगांव,पिंपळगाव – मालडोंगरी, खेडमक्ता – चौगान, गांगलवाडी – मेंडकी, आवळगांव – मडझा.

4) सिंदेवाही – नवरगांव – पळसगाव जाट, गुंजेवाही – सरडपार,रत्नापूर – शिवणी, मोहाळी नलेश्वर – वासेरा.

5) भद्रावती – चंदनखेडा – मुधोली, सांगली रै – नंदोरी, कुचना – शिवाजीनगर, कोंढा – घोडपेठ.

6) वरोरा – खांबाडा – चिकणी, टेमुर्डा – आबमक्ता, नागरी – माढेळी, चरूरखटी – सालोरी, शेगांव बु.- बोर्डा.

7 ) चंद्रपूर – दुर्गापूर, जुनोना, कोंडीमाल, पडोली ,नकोडा.

8) मूल – राजोली – मारोडा, जुनासुर्ला – बेंबाळ,चिंचाळा मो. – सुशी दाबगांव.

9) सावली – अंतरगांव – निमगाव, पाथरी – बोथली, व्याहाड खुर्द – व्याहाड बुज, कवठी – हरंबा.

10) पोभूर्णा – देवाडा खुर्द – केमारा व चिंतलधाबा – घोसरी.

11) गोंडपिपरी – करंजी – खराळपेठ, विठ्ठलवाडा – भंगाराम तळोधी, तोहगांव – धाबा.

12 ) बल्लारपूर – विसापूर – बामणी व पळसगाव – कोठारी.

13) कोरपना – भोयेगांव – आवाळपूर, उपरवाही – नांदा,वनसडी – कोडशी बु. ,परसोडा – येरगव्हाण.

14 ) जिवती – पाटण – शेगांव व खडकी रायपूर -पुडीयाल मोहदा.

15) राजुरा – गोवरी – धोपटाळा, चुनाळा – विरुर स्टेशन, रामपूर – पाचगाव, देवाडा – भेंडवी.

error: Content is protected !!